Skip to main content

महाराष्ट्रातील घाट रस्ते


मराठी विकिपीडिया

महाराष्ट्रातील घाट रस्ते

महाराष्ट्रात सह्यादीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाटांची माहिती दिली आहे.

तक्तासंपादन करा

क्रमांकघाटमार्गघाटपायथ्याचे गावघाटमाथ्याचे गावघाटवैशिष्ट्य/परिसरातील किल्ले
अणस्कुरा घाटयेरडव ता.राजापूर जि.रत्‍नागिरीअणस्कुरा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूरगाडी रस्ता; घाटमाथ्यावर-प्राचीन उगवाई देवी मंदिर व पाचपांडव शिलालेख
अंबाघाटसाखरपे ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरीअंबा ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूरगाडी रस्ता(राज्यमार्ग);किल्ले: विशाळगड
अव्हाटा घाटखोडाळा ता. मोखाडा जि. ठाणेझारवड/अव्हाटापायरस्ता; किल्ले: भोपटगड
अहुपे घाटदेहेरी ता.मुरबाड जि. ठाणेअहुपे ता. जुन्नर जि. पुणेपायरस्ता; किल्ले: सिद्धगडगोरखगडमच्छिंद्रगड भीमाशंकर
आंबेनळी (फिट्झेराल्ड(फिट्‌सेरल्ड)/रडतोंडी) घाटवाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारामहाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारामहाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगडचंद्रगड
आंबोली घाटमोखाडा ता.मोखाडा जि.ठाणेअळवंडी(वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिकपायरस्ता; किल्ले: हरिहरउतवड, भाजगड
आंबोली(२) घाटपळू ता.मुरबाड जि.ठाणेआंबोली ता.जुन्नर जि.पुणेपायरस्ता; किल्ले: धाकोबाजीवधन
आंबोली(३) घाटसावंतवाडी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्गआंबोली ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्गसावंतवाडी-बेळगाव गाडीरस्ता; आंबोली थंड हवेचे ठिकाण, हिरण्यकेशी(नैसर्गिक गुहा)
आंबोली(४)घाटआंबोली ता.खेड जि.रत्‍नागिरीचक्रदेव ता.जावळी जि.सातारापायरस्ता; किल्ले: रसाळगडसुभारगडमहिपतगड
१०उत्तर तिवरे घाटतिवरे ता.चिपळूण/खेड जि.रत्‍नागिरीवासोटा ता.जावळी जि. सातारापायरस्ता; किल्ले: वासोटा
१०अउपांड्या घाटवेल्हा, केळद (पुणे जिल्हा)कर्णावाडी (कोंकण)पायरस्ता; मढे घाटशिवथरघळ
११उंबरदरा घाटचोंढा/साकुर्ली ता.शहापूर जि.ठाणेसाम्रद ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले: रतनगडशिपनेर
१२एकदरा घाटटाकेद ता.इगतपुरी जि.नाशिककोकणेवाडी ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले: अवंधपट्टा
१३औटराम घाटचाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगावकन्नड ता.कन्नड जि.औरंगाबादचाळीसगांव-औरंगाबाद गाडीरस्ता; पितळखोरे लेणी, गौतम गुंफा, गौताळा अभयारण्य
१४कंचना मंचना घाटचांदवड, ता.चांदवड जि.नाशिकदेवळा ता.सटाणा जि.नाशिकसटाणा-नाशिक राज्यमार्ग; किल्ले: कंचन मंचनराजधेरइंद्राई
१५करूळ घाटकरूळ ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्गगगनबावडा ता.गगनबावडा जि.कोल्हापूरगाडीरस्ता; किल्ले: गगनबावडा
१६करोली घाटडोळखांब ता.शहापूर जि.ठाणेसाम्रद ता.अकोले जि. अहमदनगरपायरस्ता; किल्ले: रतनगडबाण सुळका
१७कशेडी घाटखेड ता.खेड जि.रत्‍नागिरीपोलादपूर ता.पोलादपूर जि.रायगडमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग
१८कसारा घाट (थळघाट)कसारा ता.शहापूर जि.ठाणेइगतपुरी ता.इगतपुरी जि.नाशिकरेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; किल्ले: बळवंतगडत्रिंगलवाडी
१९कात्रज घाटकात्रज ता.हवेली जि.पुणेखेड शिवापूर ता.हवेली जि.पुणेपुणे-सातारा-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.४
२०कानंद घाटहरपूड/शिंगणापूर ता.महाड जि.रायगडनिवी ता.वेल्हा जि.पुणेपायरस्ता; किल्ले: तोरणालिंगाणारायगड
२१कावला-बावला घाट/कावळ्या घाटसांदोशी छत्री निजामपूर ता.महाड जि.रायगडपानशेत ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले: रायगडकोकणदिवा
२२कुंडी घाटकुंडी/देवरूख ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरीचांदेल ता.शाहूवाडी जि.कोल्हापूरपायरस्ता; किल्ले: महिमनगड
२३कुंभा घाटकुंभा ता.माणगांव/इंदापूर जि.रायगडदापसर ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले: कुर्डुगड; मुळशी तलाव/धरण, भिरा विद्युत्‌केंद्र
२४कुंभार्ली घाटचिपळूण जि.रत्‍नागिरीहेळवाक ता.पाटण जि.साताराचिपळूण-कर्‍हाड गाडीरस्ता; किल्ले जंगली जयगड; कोयना धरण, शिवसागर तलाव
२५कुरवंडा घाटउंबरे ता.सुधागड जि.रायगडआय.एन.एस.शिवाजी ता.मावळ,जि.पुणेपायरस्ता; किल्ले: तुंगतिकोनानागफणीउंबरखिंड
२६कुसूर घाटवैजनाथ भिवपुरी ता.कर्जत जि.रायगडकुसूर ता.मावळ जि.पुणेपायरस्ता; किल्ले: ढाकबहिरीराजमाची: आंद्रा तलाव, भिवपुरी विद्युत्‌केंद्र
२७खंडाळ्याचा घाट (बोरघाट)खोपोली ता.खालापूर जि.रायगडखंडाळा ता.मावळ जि.पुणेमुंबई-बंगलोर महामार्ग ४, रेल्वेमार्ग; किल्ले: राजमाचीनागफणी, खंडाळा/लोणावळा थंड हवेची ठिकाणे
२८खंबाटकी घाटवाई ता.वाई, जि.साताराखंडाळा ता.खंडाळा जि.सातारापुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग ४; किल्ले: चंदन वंदन
२९खुटा घाटधसई ता.मुरबाड जि.ठाणेदुर्गवाडी/आंबवली ता.जुन्नर जि.पुणेपायरस्ता; किल्ले: गोरखगडमच्छिंद्रगडधाकोबा
२९ अगगनबावडा (करूळ) घाटकरूळ ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्गगगनबावडा ता.गगनबावडा जि.कोल्हापूरगाडीरस्ता; किल्ले: गगनबावडा
३०गणेश घाट (गणपती घाट)खांडस/कशेळे ता.कर्जत जि.रायगडभिमाशंकर ता.खेड जि.पुणेपायरस्ता; किल्ले: पदरचा किल्लापेठचा किल्ला; भिमाशंकर ज्योतिर्लिंग
३१गुयरीचा दराडेहेणे/साकुर्ली ता.शहापूर जि.ठाणेकुमशेत/पाचनई ता.अकोले जि. नगरपायरस्ता; किल्ले: आजापर्वत, कात्राबाई, गनचक्कर
३२गोंदा घाटमोखाडा ता.मोखाडा जि.ठाणेत्र्यंबक ता.नाशिक जि.नाशिकजव्हार-त्र्यंबक गाडीरस्ता; त्र्य़ंबकेश्वर ज्योतिर्लिंग, किल्ले ब्रह्मगिरी, हरिहरगड
३२अगोप्या घाटकसबे शिवथरगोप्यापायरस्तावेल्हा-कुंबळे-गोप्या घाट; वेल्हा-निगडे-गोप्या घाट-(कसबे-कुंभे-अंभे)शिवथर
३२बघोटगी घाटमालवणआजरेमालवण-आजरे गाडीरस्ता
३३चंदनापुरीचा घाटचंदनापुरी ता.संगमनेर जि.अहमदनगरडोळासणे ता.संगमनेर जि.अहमदनगरपुणे-नाशिक राज्यमार्ग
३४चोंढा घाटडोळखांब ता.शहापूर जि.ठाणेघाटघर ता.अकोले जि. अहमदनगरपायरस्ता; किल्ले: अलंग, कुलंग, शिपनेर
३५ढवळ्या घाटढवळा/उमरठ ता.पोलादपूर जि.रायगडजोर ता.वाई जि.सातारापायरस्ता; किल्ले: आर्थरसीट-महाबळेश्वर, चंद्रगड
३५अताम्हिणी घाटमुळशी (पुणे जिल्हा)माणगाव (अलिबाग जिल्हा)गाडी रस्ता.मुळशी तलाव
३६तोलार खिंडपाचनई ता.अकोले जि.अहमदनगरखुबी, खिरेश्वर ता.जुन्नर जि.पुणेपायरस्ता; किल्ले: हरिश्चंद्रगड
१८थळघाट (कसाऱ्याचा घाट)कसारा ता.शहापूर जि.ठाणेइगतपुरी ता.इगतपुरी जि.नाशिकरेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; किल्ले: बळवंतगड, त्रिंगलवाडी
३७दऱ्या घाटधसई ता.मुरबाड जि.ठाणेहातवीज/दुर्गवाडी ता.आंबेगांव जि.पुणेपायरस्ता; किल्ले: दुर्ग, धाकोबा
३८दक्षिण तिवरे (नायरीचा घाट)नायरी ता.संगमनेर जि.अहमदनगरचांदोली ता.शिराळा जि.सांगलीपायरस्ता; किल्ले: प्रचितगड
३९दिवे घाटहडपसर ता.हवेली जि.पुणेसासवड ता.पुरंदर जि.पुणेपुणे-सासवड रस्ता ; किल्ले: पुरंदरराज्य महामार्ग क्रं. ६४ वर लांबी ३-४ km.
५७अदेव घाट (लिंग्या घाट)
३९अनणंद भावजय घाटशहादाधडगांवधुळे जिल्हा
३९बनरदा घाटमालवणकोल्हापूरमालवण-कोल्हापूर गाडीरस्ता
४०नाणेघाटवैशाखर ता.मुरबाड जि.ठाणेघाटघर ता.जुन्नर जि.पुणेसुप्रसिद्ध पुरातन घाटमार्ग, पायरस्ता; किल्ले: जीवधन, चावंड, हडसर; घाटाच्या माथ्यावर जकात साठवण्यास दगडी रांजण, दगडात कोरलेली रहाण्याजोगी गुहा
३८नायरीचा घाट (दक्षिण तिवरेघाट)नायरी ता.संगमनेर जि.अहमदनगरचांदोली ता.शिराळा जि.सांगलीपायरस्ता; किल्ले: प्रचितगड
३८अनिवळी घाटबावनदीहातखंबामुंबई-गोवा महामार्ग;निवळी-गणपतीपुळे गाडीरस्ता
३८बनिसणीची वाटपुणे-भोर मार्ग
४१परशुराम घाटखेड ता.खेड जि.रत्‍नागिरीचिपळूण ता.चिपळूण जि.रत्‍नागिरीमुंबई-गोवा महामार्ग; परशुराम मंदिर, वासिष्ठी खाडी
४२पसरणीचा घाटवाई ता.वाई जि.सातारापांचगणी ता.महाबळेश्वर जि.सातारावाई-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: बावधन, पांडवगड, कमलगड; पांचगणी-थंड हवेचे ठिकाण
४३पार घाटकापडे/किन्हेश्वर ता.पोलादपूर जि.रायगडवाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारापायरस्ता; जावळीचे अरण्य; किल्ले: प्रतापगड
४४पिंपरी घाटफुगाळा/कसारा ता.शहापूर जि.ठाणेपिंपरी सद्‌रुद्दिन ता.इगतपुरी जि.नाशिकपायरस्ता; किल्ले: अलंग, कुलंग, मदन
फिट्झेराल्ड(फिट्‌सेरल्ड) घाट (आंबेनळी घाट/रडतोंडी घाट)वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारामहाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारामहाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगड, चंद्रगड
४५फोंडा घाटफोंडा ता.कणकवली जि.सिंधुदुर्गदाजीपूर ता. राधानगरी जि.कोल्हापूरदेवगड-कोल्हापूर गाडीरस्ता; दाजीपूर गवा अभयारण्य; किल्ले: शिवगड , विजयदुर्ग
४६बाभुळणा घाटचिंचली ता.डांग जि.डांग(गुजरात)मुल्हेर ता.सटाणा जि. नाशिकपायरस्ता; किल्ले: मुल्हेर, सालोटा, साल्हेर
४७बावडा घाटभुईबावडा ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्गगगनबावडा, जि.कोल्हापूरकोल्हापूर-राजापूर गाडीरस्ता; किल्ले:गगनबावडा
४८बिजासनी घाटशिरपूर ता.दोंडाइचा जि.धुळेसैधवा(मध्य प्रदेश)मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; बिजासनीदेवीचे मंदिर
४९बोचे घळपाणे/वारंगी ता.महाड जि.रायगडवेल्हे जि.पुणेपायरस्ता; किल्ली: तोरणा, शिवथरघळ
५०बोप्या घाटशिवथर ता.महाड जि.रायगडवेल्हे जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तोरणा, रायगड, लिंगाणा
२७बोरघाट (खंडाळ्याचा घाट)खोपोली ता.खालापूर जि.रायगडखंडाळा ता.मावळ जि.पुणेमुंबई-बंगलोर महामार्ग ४, रेल्वेमार्ग; किल्ले: राजमाची, नागफणी,खंडाळा/लोणावळा थंड हवेची ठिकाणे
५०अबोराटा नाळ
५१बैलघाटमहसा/नारीवली ता.मुरबाड जि.ठाणेभिमाशंकर ता.खेड जि.पुणेपायरस्ता; किल्ले:गोरख, मच्छिंद्रगड, सिद्धगड; भिमाशंकर ज्योतिर्लिंग
५१अभोस्ते घाटकशेडी (रत्‍नागिरी जिल्हा)परशुराम (रत्‍नागिरी जिल्हा)मुंबई-गोवा रस्ता; खेड शहर
५१बमढे घाटउपांड्या घाटकर्णावाडीपायवाट; शिवथरघळ
५२मायदरा घाटटाकेद ता.इगतपुरी जि.नाशिकबिताका ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले:अवंध, पट्टा, बितनगड
५३माळशेज घाटमोरोशी ता.मुरबाड जि.ठाणेमाळशेज ता.जुन्नर जि.पुणेकल्याण-मुरबाड-जुन्नर गाडीरस्ता; किल्ले:जिवधन, भैरवगड, हरिश्चंद्रगड; माळशेज थंड हवेचे ठिकाण
५४माळा घाटनिरडी ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरीमाळा ता.पाटण जि.सातारापायरस्ता; माळा-पाचगणी-कर्‍हाड रस्ता; किल्ले:गुणवंतगड, भैरवगड
५५मेंढ्या घाटडोळखांब ता.शहापूर जि.ठाणेघाटघर/भंडारधरा ता.अकोले जि.अहमदनगरपायरस्ता; किल्ले:अलंग, कुलंग, रतनगड, शिपनेर
५६म्हैसघाटनागद ता.चाळीसगांव जि.जळगांवनागापूर ता.कन्‍नड जि.औरंगाबादगाडीरस्ता; अंतूरचा किल्ला, गौताळा अभयारण्य
५६अम्हैसवळण घाटटाकेद ता.अकोले जि.अहमदनगरटाहाकारी ता.अकोले जि.अहमदनगरगाडीरस्ता; टाहाकारीचे जगदंबादेवीचे मंदिर; विश्रामगड
रडतोंडी (आंबेनळी,फिट्झेराल्ड-फिट्‌सेरल्ड) घाटवाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारावाई-वाठार दरम्यान ता.महाबळेश्वर जि.सातारामहाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगडचंद्रगड
५६अरांजणा घाटकुडाळआजरेकुडाळ-आजरे गाडीरस्ता
५७रामघाटभेडशी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्गचंदगड जि.कोल्हापूरपायरस्ता; किल्ले:कलानिधिगड, पारगड; तिळारी प्रकल्प
५७अलिंग्या घाट (देव घाट)उंबर्डी (कोकण)धामणव्हाळ (देश)पायरस्ता
५८वरंधा घाटबिरवाडी/माझेरी ता.महाड जि.रायगडहिरडोशी ता.भोर जि.पुणेमहाड-भोर गाडीरस्ता; कांगोरी, भावळा किल्ला; शिवथरघळ
५९वाघजाई घाटजिते ता.माणगांव जि.रायगडधामणवहाळ ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले कुर्डुगड
६०वाघजाई(२) घाटठाणाळे ता.सुधागड जि.रायगडतैलबैला/माजगांव ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले:कोरीगड, ठाणाळे गुंफा, तैलबैला, धनगड, सरसगड, सुधागड
६१वांदरे घाटआंबवली ता.कर्जत जि.रायगडवांदरे ता.खेड जि.पुणेपायरस्ता; किल्ले:पेठचा किल्ला, भोरगिरी; भिमाशंकर
६२विठा घाटसंगमनेररंधा धबधबागाडीवाट; रंधा धबधबा
६३शिंगणापूर नळीशिंगणापूर ता.महाड जि.रत्‍नागिरीघिसाई/निवी ता.वेल्हे जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तोरणा, रायगड, लिंगाणा
६४शिर घाटखोडाळा ता.मोखाडा जि.ठाणेशिरघाट/देवगांव ता.इगतपुरी जि.नाशिकवाडा-त्र्यंबक गाडीरस्ता; किल्ले: हरीशगड; फणी ओंगर; अपर वैतरणा(अळवंडी) धरण; वैतरणा जलविद्युत केंद्र
६५शेवत्या घाट(शेवट्या घाट)शेवता ता.महाड. जि.रायगडगोगुळशी ता.वेल्हे जि.पुणेपायवाट; किल्ले: तोरणा, रायगड
६६सव घाटजांबुळपाडाघुसळखांब ता.मावळ जि.पुणेपायरस्ता; किल्ले:तिकोना तुंग
६७सवती घाटहरसूल ता.पेठ जि.नाशिकगंगापूर जि.नाशिकपेठ-नाशिक गाडीरस्ता; वाघेरा किल्ला; गंगापूर धरण
६८सवाष्णी घाटबैरामपाडा ता.सुधागड जि.रायगडतैलबैला ता.मुळशी जि.पुणेपायरस्ता; किल्ले:कोरीगड, तैलबैला, घनगड, सुधागड
६९सावळ घाटपेठ जि.नाशिकआंबेगांव ता.दिंडोरी जि.नाशिकपेठ-नाशिक गाडीरस्ता; रामसेज किल्ला; वाघाड धरण
७०सावळे घाटआंबवली कशेळी ता.कर्जत जि.रायगडसावळे ता.मावळ जि.पुणेपायरस्ता; पेठचा किल्ला; आंद्रा जलाशय
७१हनुमंत घाट/रांगणा घाटकुडाळ ता.कणकवली जि.सिंधुदुर्गपाटगांव ता.भुदरगड जि.कोल्हापूरपायरस्ता किल्ले:मनोहर गड, रांगणा
७२हातलोट घाटबिरमणी ता.खेड जि.रत्‍नागिरीघोणसपूर ता.महाबळेश्वर जि.सातारापायरस्ता किल्ले: मकरंद, महिपतगड, रसाळगड, सुमारगड

तक्त्यात नसलेले घाटसंपादन करा

  • शिडी घाट : हा गणेश घाटाप्रमाणेच खांडसहून भीमाशंकरला जातो. मार्गावरच्या एका विशाक शिलाखंडाला टाळण्यासाठी त्याच्या जवळून खडकात बसवलेल्या शिडीने वर जावे लागते, म्हणून शिडी घाट हे नाव.

माहिती नसलेले घाटसंपादन करा

ज्या प्रसिद्ध, अप्रसिद्ध आणि अल्पप्रसिद्ध घाटांची तपशीलवार माहिती मिळू शकली नाही ते घाट असे :

  • अंधारीची वाट : वाजंत्री घाटाच्या दक्षिणेला घोघोळ अंधारीची वाट वर चढते. ही दैत्यासूर धबधब्याच्या बाजूने डावीकडून थेट माथ्यावर जाते.
  • डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट (हा तक्त्यात अव्हाटा घाट या नावाने आला आहे).
  • आपटी खिंड (पवन मावळ)
  • आंबडस घाट परशुराम घाटाला पर्यायी घाट)
  • आंबेनाळ घाट- गोप्या घाटाच्या उत्तरेस एक मैल आंबेशिवतरजवळ हा घाट आहे येथून पुण्यास जाण्यास मार्ग आहे.
  • खेड ते मेढे, सातारा रस्त्यावर आंबोली घाट (तक्त्यात तीन आंबोली घाट आहेत).
  • आरवली घाट (संगमेश्वर तालुका), मुंबई गोवा मार्ग. आरवली-तुरळ-बावनदी रस्ता.
  • इन्सुली घाट : हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा यांच्या दरम्यान आहे.
  • उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उपांडा खिंड-कर्णवडी-रानवडी-महाड : अंतर - १०६ किमी ; (केळदनंतर ही पायवाट आहे).
  • उंबर्डे घाट : वरंधा घाटाच्या उत्तरेस आठ किमीवर माझेरीजवळ उंबर्डें घाट आहे.
  • पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
  • उर्से खिंड (पवन मावळ)
  • ओणी घाट (म्हणजेच हातिवले घाट?)
  • करवली घाट
  • जुन्नर-पैठण रस्त्यावरील कसारवाडी घाट
  • कर्जत ते आंध्र खोरे व नवलाख उंबरे रस्त्यावर कसूर घाट
  • कळढोण घाट
  • कळमंजाचा दरा
  • सुरगाणा-कळवण रस्त्यावर कांचनमंचन व मोरकंडा घाट
  • महाड-भोर रस्त्यावर कामठा घाट, भोपे घाट व वरंधा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
  • कामठा आणि ढवळा घाट : फिट्झजेरल्ड घाटाच्या उत्तरेस सुमारें ८ -९ किमीवर आहेत. हे फक्त पायरस्ते असून यांचा कोणी फारसा उपयोग करीत नाहीं. या मार्गानें भोर संस्थानांतून वाई येथें जातां येतें.
  • कामथे घाट (चिपळूण शहर आणि सावर्डे यांच्या दरम्यान)
  • कुंडल घाट
  • कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
  • कुंभे घाट : मानगड किल्ल्याच्या पायथ्याचे बोरवाडी/चाचेगाव (कोकण)-माजुर्णे गाव- माथ्यावरचे कुंभे गाव. किंवा मानगड-माजुर्णे-कुंभेघाट-कुंभेवाडी.
  • कुंभेनळी घाट
  • कुसुर घाट
  • कुळुंबी घाट
  • केळघर घाट : हा घाट महाडवरून साताऱ्याकडे जाताना लागतो.
  • केळद घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे) तो घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी/कर्णवडी गाव यांना जोडतो. या घाटालाच मढे घाट म्हणतात. सिंहगडच्या लढाईत मेलेल्या मावळ्यांची प्रेते याच घाटातून कोकणातील उमरठ गावी नेली.
  • खरीव घाट : हा घाट वेल्हे तालुक्यातील खरीव गावात आहे. वाजेघर भागातील नागरिक यामार्गे वेल्हे मधून ये जा करतात.(पुणे जिल्हा)
  • खालापूर-नाणे रस्त्यावर कोकण दरवाजा घाट किंवा राजमाची घाट
  • कोंझर (रायगडच्या पायथ्याचे गाव) व पाचाड यांच्या दरम्यानचा घाट
  • भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण रस्त्यावरील कोंडाईवारी घाट
  • राजापूर-लांजा-रत्‍नागिरी रस्त्यावर कोंड्ये घाट
  • मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाली घाट
  • कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
  • कोल्हापू्र ते कोकण रस्त्यावरील गगनबाबडा घाट आणि भुईबावडा घाट
  • कौल्या घाट
  • खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान गणेश घाट, गुगळ घाट आणि शिडी घाट हे तीन पायरस्ते आहेत..
  • खेतोबा वाट
  • गुयरीदार
  • डहाणू, जव्हार ते नाशिक रस्त्यावर गोडा घाट व आंबोली घाट (तक्त्यात आहे)
  • पुणे-नाशिक रस्त्यावर खेड घाट
  • खोनोली-कोचरेवाडी घाट (चाफळ - सातारा जिल्हा)
  • गोप्या घाट
  • घोडेपाडी घाट
  • चंद्रे आणि हुंबे मेट- हे दोन मार्ग त्रिंबकहून मोखाड्यास जाण्याकरितां आहेत. चंद्रे मेट सोपा आहे. हुंबे मेट हा फक्त पायरस्ता आहे.
  • चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडीजवळचा घाट
  • चिकणदरा
  • चिवेली घाट (चिपळूण तालुक्यातील कौंढरताम्हाणे-चिवेली-गोंधळे रस्ता)
  • शहापूर-अकोले (नगर जिल्हा) रस्त्यावर चेंढ्या घाट व मेंढ्या घाट
  • टेरव घाट (कामथे घाटाला पर्यायी घाट)
  • तळेगाव खिंड (पवन मावळ)
  • जंजिरा-पौड रस्त्यावर ताम्हण घाट
  • तिलारी घाट (दोडामार्ग तालुका - सिंधुदुर्ग जिल्हा)
  • कल्याण-अकोले रस्त्यावर तोरण घाट
  • तोरंगण घाट (मोखाडा)
  • दिघी घाट
  • दुधिवरे खिंड (पवन मावळ)
  • दौंडज खिंड- जेजुरी-वाल्हे रस्त्यावरील जयाद्री डोंगरावरची खिंड
  • नडगिवे घाटे : हा खारेपाटण आणि तळेरे यांच्या दरम्यान आहे.
  • नवजा घाट (कुंभार्ली घाटाला पर्यायी रस्ता)
  • नाखिंदा घाट
  • नाणदांड घाट (सुधागड परिसरातील घाट)
  • निसणी घाट- लिंग घाटाच्या उत्तरेस तीन किलोमीटरवर हा घाट आहे. हा फक्त पायरस्ता असून चढ अतिशय आहे.
  • नेरळ रेल्वे स्टेशनपासून ते माथेरानपूर्वी येणाऱ्या दस्तुरी नाक्यापर्यंतचा घाट (नाव माहीत नाही)
  • न्हावी घाट
  • पाथरा
  • पाबे घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे). पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट - वेल्हे.
  • दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट
  • पाऊलखाची वाट
  • पिंपरी घाट- ताम्हिणी घाटांच्या उत्तरेस ६ किमीवर पिंपरी घाट आहे. पुण्यातून कोंकणात उतरण्यासाठी चांगला.
  • पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ-अवसरी घाट (तालुका आंबेगाव)
  • फेण्याघाट
  • बऊर खिंड (पवन मावळ)
  • डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घाट
  • बाणची नाळ
  • विजयदुर्ग, देवगड ते बावडा रस्त्यावर बावडा घाट
  • जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान बैल घाट; बैलदारा घाट, वाजंत्री घाट.
  • बोपदेव घाट : सासवड आणि पुणे(स्वारगेट) यांच्या दरम्यान-सिंहगड कॉलेजमार्गे.
  • बोचेमाळ घाट : देशावरून कोकणात उतरणारी एक पायवाट; खानू (पुणे जिल्हा)-हेडमाची पठार-वारंगी (रायगड जिल्हा)
  • भट्टी घाट : तोरणा किल्ला आणि केळद यांच्या दरम्यान
  • भुईबावडा घाट : खारेपाटण ते गगनबावडा रस्त्यावर गगनबावड्याच्या दीड किलोमीटर अलीकडे
  • नेरळ-पनवेल ते घाडे-आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट
  • राजापूर-भुईबावडा घाट-पहिलीवाडी. गगनबावडा घाटाला पर्यायी घाट
  • महाड-भोर रस्त्यावर भोपे घाट, वंरधा घाट व कामठा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
  • मढे घाट : वेल्हे-केळद. केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट.
  • शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट
  • सुरगाणा-कळवण रस्त्यावर मोरकंडा घाट व कांचनमंचन घाट
  • रघुवीर घाट : हा मोटारेबल घाट महिमंडणगडाजवळ आहे.
  • बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबारी घाट
  • खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची घाट किंवा कोकण दरवाजा घाट
  • रामपूर घाट (चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना जोडणारा घाट)
  • रोटी घाट - पाटस ते रोटी या दरम्यान.. पुणे-सोलापूर महामार्ग (वरवंड व उंडवडी गवळ्याची यांच्या दरम्यानचा घाट)
  • कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट (तक्त्यात एक कुंभा घाट आहे)
  • लिंग घाट- कुंभ घाटाच्या उत्तरेस ६ किलोमीटरवर हा घाट आहे.
  • वरंधा घाट- कामठा खिंडीच्या उत्तरेस पांच मैलांवर वरंधा नांवाच्या खेड्याजवळ हा घाट आहे. या घाटांतून हिरडोशी-भोर या गांवावरून पुण्यास रस्ता जातो. इ. स. १८६७ सालीं हा रस्ता तयार झाला. वरंधा घाटाच्या उत्तरेस पाव मैलावर माझेरीजवळ उंबर्डें घाट आहे. पायरस्त्याप्रमाणेंच याचा उपयोग होतो.
  • वर्धनगड घाट - सातारा-दहीवडी रस्त्यावर कोरेगावजवळ
  • वाजंत्री घाट : जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यानचा बैला घाट (वाजंत्री घाट).
  • नाशिक-गिरणारे-हर्सूल रस्त्यावर वाघेरा घाट
  • वाघोबा घाट : पालघर-मनोर रस्त्यावर
  • जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान वाजंत्री घाट; बैला घाट..
  • रत्‍नागिरी-मलकापूर रस्त्यावर विशाळगड घाट
  • विळद घाट हा अहमदनगरच्या उत्तरेस नगरहून राहुरीला जाणाऱ्या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते
  • वेताळवाडी घाट. हा घाट औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील वेताळगड किल्ल्याजवळ आणि वेताळवाडी धरणाजवळ आहे.
  • खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत.
  • शेंडूर घाट : गोंदुकुप्पी-शेंडूर दरम्यानचा (बेळगाव जिल्हा)
  • शिंदवणे घाट : पंढरपूरहून आळंदीला जाताना (जेजुरी-आळंदी रस्त्यावर) पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळ.
  • वाडे-नाशिक रस्त्यावर शिरघाट (तक्त्यात श्रीघाट या नावाने)
  • दमण, पेठ ते नाशिक रस्त्यावर सत्ती घाट
  • सांधणदरी
  • सालपे घाट
  • पेठ-दिंडोरी रस्त्यावर सावळ घाट
  • कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर सावळा घाट व कोळंबा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
  • सिंहगड घाट रस्ता (खडकवासला ते सिंहगड दरम्यानचा)
  • सुर्ली घाट - हा सातारा जिल्ह्यात कडेगांव तालुक्यात आहे. कराडहून पलूस-विटा कडे जाताना हा घाट लागतो. जवळच सदाशिवगड (कराड) हा किल्ला आहे.
  • हळदाघाट : हा घाट औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील अंभईजवळ आहे.
  • हातलोट घाट : हा मधुमकरंदगडाला जाताना लागतो.
  • हातिवले घाट : ओणी ते हातिवले दरम्यान(राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा)

या विषयावरील मराठी पुस्तकेसंपादन करा

  • घाट वाटा (सुशिल दुधाणे)
  • चढाई उतराई (आनंद पाळंदे)
  • अधिक पुस्तके www.SahyadriBooks.com येथे उपलब्ध आहेत.

हे ही पहासंपादन करा

Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी