Posts

Showing posts from January, 2022

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

Image
वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे   #वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे पाकिस्तानच्या लाहोरवर विजय मिळवून गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे पुन्हा भारतात आणणारे.... गुजरातच्या सोमनाथ मंदिराबद्दल अनेकांनी ऐकले असेलच. हे मंदिर भारतातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. ज्यांना भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते... आणि एकेकाळी हे मंदिर आपल्या अफाट संपत्तीसाठी प्रसिद्ध होते... पण अनेक विदेशी आक्रमकांनी मंदिरातील पैशाच्या लालसेपोटी या मंदिरावर आक्रमण केले.. त्यात सर्वात विध्वंसक आणि भयंकर हल्ला मुहम्मद गजनवीचा झाला. मोहम्मद गझनवी मुलतानच्या प्रदेशात दाखल, तुर्क, अरब, बगदादी आणि अफगाणी दरोडेखोरांसह 20 नोव्हेंबरला. इ.स. 1024 रोजी जेव्हा मुहम्मद गज्नीने भारतावर आक्रमण केले तेव्हा तो भारताच्या विविध क्षेत्रांत इस्लामीकरण करीत असे. इस्लाम धर्म न मानणाऱ्या काफिर (हिंदू) लोकांची क्रूर हत्या करण्यात आली. आणि अखेर 1025 जानेवारी 1025 रोजी गुजरातच्या सोमनाथ मंदिराजवळ मुहम्मद गजनवी पोहोचली. यावेळी त्याने मंदिराला लक्ष्य बनवले.... आणि मंदिरातला पुजारी आणि हजारो हिंदूंच...

चंद्रगड चे चंद्रभान सरदेसाई

Image
चंद्रगड चे चंद्रभान सरदेसाई   चंद्रगड चे चंद्रभान सरदेसाई महाबळेश्वर अरण्यातील चंद्रगड येथील चंद्रभान आणि बाजी सरदेसाई कथानकाची माहिती "चंद्रगड" एक हजार दोन हजार लोकवस्तीचे गाव. महाबळेश्वर महादेवाच्या घनदाट अरण्यातील शेवटचे टोक. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात बिकट अडचणीत वसलेले हे गाव. अशा घनदाट अरण्यात राहण्याचे धाडस केवळ वाघातच असते. चंद्रगड ची माणसे पण काही वाघापेक्षा कमी नव्हती. अश्या हजार दोन हजार वाघांचा म्होरक्या होता चंद्रभान सरदेसाई..! बाराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली समाधिस्त झाल्या आणि सर्व महाराष्ट्रावर जणू अवकळा पसरली. राजे रामदेवराय यादवांचा वैभवसंपन्न महाराष्ट्र गनिमांच्या परकीय सत्ताधाऱ्यांच्या टोळधाडींची रतीबाने शिकार होऊ लागला. कर्तृत्ववान मनगटांची कित्येक राजघराणी परकीय सत्तेची मांडलिक बनू लागली.! सत्ता,जहागिरी,स्वार्थ यासाठी स्वकीयांच्या माना तलवारीने उडवणे म्हणजे पोरखेळ होऊ लागला होता..! स्वाभिमान,स्वत्व नावालाही शिल्लक नव्हते असे म्हटले तरी वावगे ठरणार नव्हते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळचे क्षत्रिय तेज असणारी काही छोटी छोटी राजघराणी ...

आदिशक्ती_श्री_रामवरदायिनी_मंदिर चोरवणे,ता खेड,जि.रत्नागिरी

Image
आदिशक्ती_श्री_रामवरदायिनी_मंदिर चोरवणे,ता खेड,जि.रत्नागिरी   #आदिशक्ती_श्री_रामवरदायिनी_मंदिर चोरवणे,ता खेड,जि.रत्नागिरी भारत देशाच्या संतांच्या भूमीत,कोकण किनारपट्टीतील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हातील खेड तालुखा आणि त्यातील, पवित्र वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानी, स्वयंभू नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत, चोरवणे गाव आणि या गावाचे ग्रामदैवत शिंदे घराण्याचे आदिदैवत असलेले श्री रामवरदायिनी मातेचे मंदिर रत्नागिरी जिल्हातील श्रद्धास्थान आहे. त्रेतायुगा मध्ये रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलामध्ये फिरत होते. त्यांना बघून पार्वती शंकराला म्हणली,"राम सीतेच्या शोधात फार व्याकूळ झाले आहेत, त्यांची ती अवस्था मला पहावत नाही, तेव्हा मी त्यांची सीता बनून त्यांच्याकडे जाते, जेणेकरून ते ह्या दु:खातून सावरतील". तेव्हा शंकर म्हणाले "तसे काही करू नकोस ते तुला ओळखतील, ते परम पुरुष असून, एकवचनी, एकबाणी आहेत. शिवाय ते विष्णूचाच अवतार आहेत. परंतु पार्वतीला त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही., तिने सीतेचे रूप घे...

महालक्ष्मी मंदिर

Image
महालक्ष्मी मंदिर  महालक्ष्मी मंदिर हे एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे जे देवी महालक्ष्मीला समर्पित आहे, भारताच्या प्राचीन कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे.. देवी पुराणानुसार हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे, स्कंद पुराण आणि अष्ट दास शक्तीपीठ स्तोत्रम च्या शंकर संहिता नुसार 18 महाशक्तीपीठांपैकी एक.. वेंकटेश्वर कल्याणम च्या मागे असलेल्या कथेसह, महाविष्णूशी लढा दिल्यानंतर आणि खोलासुराचा वध केल्यावर ती येथे राहिली असे म्हटले जाते.. हे मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार चालुक्य साम्राज्याचे आहे आणि पहिल्यांदा 7 व्या शतकात बांधले गेले.. अनेक पुराणांमध्ये मंदिराचा उल्लेख आहे. कोकणचा राजा कामदेव, चालुक्य, शिलाहारा, देवगिरी राजवटीतील यादव यांनी या शहराला भेट दिल्याचा पुरावा आहे. आदि शंकराचार्यांनीही भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या भागावर राज्य केले आणि त्यांनी मंदिराला नियमित भेट दिली. कर्णदेवने जंगल कापले आणि मंदिराला प्रकाशात आणले. डॉ. भांडारकर आणि श्री खरे यांच्या मते हे अस्तित्व 8 व्या शतकात गेले आहे.. इतिहास चक्र दर्शवते की हे मंदिर महाजनपदाच्या काळातील आहे. 8 व्या शतका...

नाणेघाट ( जुन्नर )

Image
नाणेघाट ( जुन्नर )   नाणेघाट ( जुन्नर ) सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. त्यांपैकी नाणेघाट हा सर्वात प्राचीन व सोयीस्कर. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. तो घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर, कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर व जुन्नरपासून सुमारे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही...