प्राचीन भारतातील विद्यापिठे

संदर्भ : प्रा. उद्धव अघाव
लोकराज्य- जून २००४

भारतीय शिक्षण प्रणाली प्राचीन काळापासून जगप्रसिद्ध आहे नालंदा, तक्षशिला, वाराणसी (काशी), विक्रमशिला अशी अनेक विद्यापीठे त्याकाळी भारतात होती या एका विद्यापीठात हजारो देशी-विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत. अशा या प्राचीन भारतीय विद्यापीठांचा हा इतिहास...

व्यक्तीच्या बौद्धिक मानसिक व सांस्कृतिक विकासाला कारणीभूत होणारे जे ज्ञान, ते शिक्षण होय. अशी शिक्षण शब्दाची व्यापक अर्थाने व्याख्या करता येईल.

विद्यार्थीदशेत गुरूकडून जे ज्ञान मिळते ते शिक्षण होय. अशी ही शिक्षणाची व्याख्या होईल. तसे पाहिले तर माणूस आयुष्यभर शिक्षण घेत असतो. वाढत्या वयाबरोबर, बदलत्या काळासोबत, अनुभवातून आणि आसपास घडणार्‍या घटना, घडामोडींच्या, निरीक्षणाने तसेच वाचनातून माणसाच्या ज्ञानात सतत भर पडत असते. एखादी व्यक्ती इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरते कारण त्या व्यक्तीचे मन व बुद्धी ही शिक्षणाने प्रगत व विकसित झालेली असते.

प्राचीन शिक्षण प्रणाली सुव्यवस्थित होती. त्यामुळेच भारताचे समस्त प्राचीन साहित्य व इतिहास सुरक्षित व समृद्ध होत गेले. मानवाच्या इतिहासात शिक्षणात सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे मानवाचा सामाजिक बौद्धिक व शैक्षणिक विकास होऊ शकला. शिक्षणाचे महत्त्व प्राचीन ऋषीमुनींनी अनेक प्रकारांतून सांगितले आहे. मानवी जीवनात पुरुषार्थ साधण्यासाठी संपूर्ण जीवनाचे चार आश्रम आत विभाजन केले जाई.

ब्रह्मचर्य आश्रम हा पहिला आश्रम असून त्यापासून जीवनाला व शिक्षणाला सुरुवात होई. विद्याभ्यास व ज्ञानप्राप्ती हाच या आश्रमाचा उद्देश होता. प्राचीन भारतीय लोकांनी त्यांच्या काळात अनुसरून शिक्षणाचे काही उद्देश मानलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात पावित्र्य आणि धार्मिकता यांची भावना निर्माण करणे, चारित्र्य निर्मिती करणे, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे, साहित्य व संस्कृतीचे संरक्षण करणे, आणि कर्तव्याची भावना जागृत करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्देश प्राचीन भारतीयांनी मानले होते. 

♨️प्राचीन भारतीय शिक्षण प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये होती♨️

👉भारतात शिक्षणाची सुरुवात उपनयन संस्कार यापासून होत असे .
👉शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी गुरुकुलात (तपोवन) रहात असे.
👉 गुरु व शिष्य यांच्यात पिता व पुत्र प्रमाणे स्नेहाचे संबंध असत.
👉संपूर्ण शिक्षणासाठी कसलीही फी नव्हती. 
👉कृतज्ञता म्हणून वागणूक देत असत. 
👉गुरुकुलात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुरु समान वागणूक देत असत.
👉शिक्षणाच्या पूर्ण कालावधीत शिष्याला ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक होते 
👉विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व सामर्थ्य नुसार पाठ विषय तसेच व्यावहारिक शिक्षण दिले जाई. 
👉साधे जीवन व उच्च विचार हेच भारतीय शिक्षणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.

या सर्व वैशिष्ट्यांमुळे भारतीय शिक्षण प्रणाली प्राचीन काळात व आजही जगप्रसिद्ध आहे. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक विषयांचा समावेश होता. वेदांचे अध्ययन करणे हे शिक्षणाचे प्रथम क्षेत्र होते. प्रारंभी अभ्यास विषयांची संख्या कमी होती. परंतु कालक्रमानुसार विषयांची संख्या वाढत गेली.

गुरुकुल :-

गुरुकुल ही सर्वाधिक प्राचीन शिक्षण संस्था होती. गुरुकुल नगराच्या बाहेर वनात असे. प्रत्येक व्यक्तीस शिक्षणासाठी गुरुकुलात जावे लागे. गुरुकुल हेच शिक्षणाचे सर्वप्रथम केंद्र होते. वेद, पुराणे, रामायण, महाभारत व संस्कृत साहित्यात विभिन्न गुरुकुलांचे उल्लेख आढळतात. गुरुकुल शिवाय राजधानी, तीर्थस्थळे, बौद्धविहार व अग्रहार ग्राम ही सुद्धा शिक्षणाची केंद्रे होती.

राजे स्वतः विद्वान असल्याने ते अनेक विद्वानांना आश्रय देत. राजधानीतील राज्यसभेत अनेक विद्वान असत. या विद्वान कडे विद्यार्थी ज्ञानप्राप्तीसाठी येत असत. उज्जैयिनी, मिथिला, तक्षशिला, पाटलीपुत्र, धारा, वाशिम, बदामी, कल्यानी, कंधार, वेरूळ, कनोज, व मगद ही प्राचीन काळात शिक्षणाची केंद्रे होती. अग्रहार गावे हे सुद्धा प्राचीन काळात शिक्षणाची केंद्रे होती. राजे-महाराजे लोक आपल्या राज्यातील विद्वानांना अनेक गावे दान देत असत. ब्राह्मण विद्वान अशा गावाच्या उत्पन्नावरच उपजीविका करीत असत. दान म्हणून दिल्या गेलेल्या अशा गावांनाच अग्रहार म्हणत असत. विद्वान लोक अशा अग्रहारात कायमस्वरूपी राहत असत. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यामध्ये शिक्षणासाठी येत.

इसवी सन सहाव्या शतकानंतर दक्षिण भारतात चालुक्य, राष्ट्रकूट व यादव यांच्या राज्यात शिक्षणासाठी अग्रहार गावे ब्राह्मणांना दिलेली असत. चालुक्याच्या लेखातून महाघटिका स्थानाचा (महाविद्यालय) उल्लेख आढळतो. प्रतिष्ठान, नाशिक व दक्षिणेतील कांची ही प्राचीन काळातील महत्त्वाची शिक्षण केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आलेली होती.

बौद्धविहारमठात सुद्धा शिक्षणाची केंद्रे असत. बौद्ध साहित्यावरून तत्कालीन शिक्षण केंद्राची माहिती मिळते. या विभिन्न शिक्षण केंद्राशिवाय अनेक प्रसिद्ध विद्यापीठेही शिक्षण केंद्रे होती. नालंदा, विक्रमशिला, वाराणसी, काशी,अजिंठा, तक्षशिला ही विद्यापीठे प्राचीन काळात जगात प्रसिद्ध होती. या विद्यापीठ बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :-

१) नालंदा विद्यापिठ

गुप्तांच्या काळात नालंदा विद्यापीठाचा उदय झाला. प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ बिहार राज्यातील पाटण्यापासून 20 मैल तर राजगिरच्या उत्तरेस 11.72 कि.मी. अंतरावर हे विद्यापीठ होते. त्याची स्थापना इस.वी.सन पाचव्या शतकाच्या सुरुवातीस झाली असावी. कुमार गुप्ताने नालंदा येथील विद्यालयाला आश्रय दिल्यामुळे या विद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात झाले. विद्यापीठ स्थापनेचे व संवर्धनाचे श्रेय गुप्त वंशांच्या महाराजांकडे जाते. काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचा शिष्य आर्यदेव यास देतात. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर श्री नालंदा महाविहार आर्य भिक्षूसंघस्य असे लिहिलेले आहे. व तिच्या दोन्ही बाजू वर सारनाथाचे धम्मचक्र आहे.

हुएत्संग भारतात आला त्यावेळी राजा हर्षाचे राज्य चालू होते. हर्षाने या विद्यापीठाच्या योगाक्षेमास 100 गावे दान दिली होती. हुएत्संग याने या विद्यापीठाचे सविस्तर वर्णन केले आहे.

नालंदा विद्यापीठाच्या सुमारे दीड कि.मी. लांब व पाऊण कि.मी. रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वस्तीग्रह होते. नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय खूप मोठे होते. या ग्रंथालयासाठी रत्नासागर, रत्नोदधीरत्नरंजन अशा तीन सुंदर इमारती होत्या. या ग्रंथालयाच्या विभागास धर्मगंज/ धर्मयज्ञ म्हणत असत. रत्नदधी ही इमारत नऊ मजली असून या इमारतीत प्रामुख्याने तांत्रिक पंथा संबंधीचे साहित्य होते. ग्रंथांना/पुस्तकांना रत समजून ग्रंथालयाच्या इमारतीला वरील प्रकारची नावे दिली होती.

निवासासाठी 4000 व अभ्यासासाठी 1OOO खोल्या होत्या 8,500 ते 10,000 विद्यार्थी 1,500 शिक्षक, आचार्य होते.

दररोज शंभर व्याख्याने होत. विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,कपडालत्ता, औषधोपचार, व शिक्षण विनामूल्य असे. हा सर्व खर्च दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या गावांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यांतून चालत असे.

नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत उदार आणि बहुव्यापक होता. त्यात सांप्रदायिक ते स्थान नव्हते . बौद्धधर्माचे महायान व हीनयान पंथ / संप्रदाय ,जैन धर्म व इतर धर्म याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष,चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेद, उपनिषिदे, सांख्य, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, स्थापत्यकला, इत्यादी अनेक विषयांचे अध्ययन व अध्यापनाची व्यवस्था होती.

दररोज वाद-विवाद व चर्चा आयोजित केल्या जात. हर्षाच्या काळात विद्यापीठाचा कुलगुरू शीलभद्र होता .त्या काळी सहा विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक असे. नालंदा विद्यापीठाची प्रसिद्धी भारतात व विदेशातही होती. या कीर्तीमुळे देशाच्या कानाकोप-यातून व चीन, कोरिया, तिबेट इत्यादी देशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. तसेच विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे त्यांना नालंदा विद्यापीठात सहज प्रवेश मिळत नसे. तर त्यासाठी द्वारपंडित घेत असलेली प्रवेश परीक्षा अत्यंत कडक असे. प्रवेश घेऊन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शेकडा 20-3O टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळे. या विद्यापीठात अध्यापनाचे काम महान विद्वान करत असत. धर्मपाठक, चंद्रपाल, आर्यदेव, प्रभामित्र, शीलभद्र, शांतरक्षित, जिनमीन व ज्ञानचंद्र हे विद्वान अध्यापनाचे कार्य करत असत. या विद्यापीठाने कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीर्ती ,कमलशील इत्यादी विद्वानांची मालिका निर्माण केली. यांच्याकडून शिक्षण मिळावे म्हणून फाहियान घोनसी ह्युनिचिऊ, नाऊसिंग हँग, आर्यवर्मन, बुध्दवर्म वगैरे मंडळी चीन तिबेट कोरिया व तू खार इत्यादी ठिकाणाहूून नालंदा येथे आलेली होती.

विद्यापीठाच्या परिसरात अनेक इमारती होत्या. काही इमारती महाविद्यालयासाठी, काही ग्रंथालयासाठी, तर काही इमारती विद्यार्थी व अध्यापकांच्या निवासासाठी होत्या. येथील इमारती अनेक मजली होत्या. इमारतीच्या भिंती व स्तंभांची सजावट केलेली होती. उद्याने, स्नानगृहे व क्रीडांगणे होती.

चारित्र्यसंपन्न व बुद्धिमान अध्यापक, अभ्यासू व होतकरू विद्यार्थी, कुशल प्रशासन, राज्यकर्त्यांचा सतत लाभलेला आश्रय यामुळे नालंदा विद्यापीठाची उत्तरोत्तर सतत आठ शतके भरभराट होत गेली. प्राचीन भारतातील अध्ययन अध्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व समृद्धीला भरून देण्यात या विद्यापीठाचा फार मोठा वाटा आहे.

विक्रमशिला विद्यापीठाच्या प्रगतीबरोबर नालंदा विद्यापीठात उतरती कळा लागली. हे विद्यापीठ इसवीसन बाराशे पर्यंत विद्यादानाचे कार्य करत होते. तेराव्या शतकाच्या शेवटी बखत्यार खिलजीच्या स्वारीने मोडतोड व जाळून त्याचा विध्वंस केला. नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून त्याच ठिकाणी बिहार सरकारच्या सहकार्याने 1951साली नव-नालंदा महाविहार (नालंदा पाली प्रतिष्ठान ) स्थापन करण्यात आले आहे.

२) तक्षशिला विद्यापिठ :-

भारतातील तक्षशिला हे विद्यापीठ सर्वात प्राचीन असून तक्षशिला ही नगरी प्राचीन गांधार देशाची राजधानी होती. पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण सध्या पाकिस्तानातील रावळपिंडी पासून वायव्येस सुमारे 35 किमी अंतरावर आधुनिक सराईकल या रेल्वेस्थानकाजवळ आहे.

इसवीसनाच्या पाचव्या शतकात नालंदा विद्यापीठाचा उदय होण्यापूर्वी तक्षशिला हे विद्यापीठ महत्त्वाचे शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले होते. तक्षशिला हे शहर सीमेवर असल्याने शक, कुशाण,हुण, ग्रीक व पल्लव या परकीयांच्या आक्रमणाची झळ सतत या विद्यापीठाला पोहोचली.

भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख संचालक सर जॉन मार्शल यांनी या भागात उत्खनन केले. परंतु या प्राचीन विद्यापीठाचे उल्लेख रामायण-महाभारत आणि जातकांत आढळतात. काही ग्रीक व चिनी परदेशी प्रवाशांनी आपल्या प्रवास वृत्तांतात या विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे.

कैकयीपुत्र भरताने तक्षशिलानगर वसविले. व त्याला तक्ष या आपल्या मुलाचे नाव दिले असे मानले जाते. इसवी सन पूर्व आठव्या शतकापासून इसवी सन चौथ्या शतकापर्यंत सुमारे बाराशे वर्षे हे विद्यापीठ अस्तित्वात होते.

तक्षशिला विद्यापीठ आशिया खंडात प्रसिद्धीस आले होते. या विद्यापीठाची रचना ही आधुनिक विद्यापीठांप्रमाणे नव्हती. तेथे अनेक विद्यार्थी उच्च अध्यायाना करिता देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच आशिया,युरोप मधील देशातूनही येत. प्रत्येक शिक्षक म्हणजे एक स्वतंत्र संस्थाच असे. त्यांना त्यांचे प्रौढ विद्यार्थी मदत करीत असत. एका शिक्षकाच्या हाताखाली सुमारे 500 विद्यार्थी असत असा जातकांत उल्लेख आहे.

विद्यार्थ्यांच्या भोजन निवासाची सोय विद्यापीठाच्या वसतिगृहात असे. सधन वर्गातील विद्यार्थी संपूर्ण शिक्षणाकरिता सामान्यतः1000 सुवर्ण नाणी शुल्क म्हणून देत असत. निर्धन विद्यार्थी गुरुगृही राहून नेमलेली कामे दिवसा करीत आणि रात्री अध्ययन करीत असत. काही विद्यार्थी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळवून गुरु दक्षिणा देत.

या विद्यापीठात एकाच वेळी 100 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येई. प्रत्येक प्रवेश परीक्षेनंतर सोळा सतरा वर्षे वयाचे विद्यार्थी घेतले जात. शिक्षणाचा कालावधी सामान्यतः सात ते आठ वर्षांचा असे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात या ठिकाणी बनारस, राजग्रह, मिथिला इत्यादी नगरातून व कुरु, कोसल इत्यादी राज्यांतून विद्यार्थी येत. कोसलसा प्रसेनजित राजा व जीवक राजपुत्र (बिंबिसारचा अनौरस पुत्र) यांनी येथेच शिक्षण घेतले. वैय्यकरणी पाणिनी, चिकित्सा विशारद कौभारभृत्य आजीवक, अर्थशास्त्रकार कौटिल्य, व मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनी तक्षशिला विद्यापिठात विद्यार्जन केले. असे मानले जाते. अद्यापकांच्या श्रेणीत धौम्य ऋषी, आयुर्वेदाचार्य जीवक इत्यादींचे उल्लेख येतात.

तक्षशिलेस फक्त उच्च शिक्षणाची व्यवस्था होती. सखोल अभ्यासावर भर दिला जाई. राज्यशास्त्र, वैद्यक, धनुर्विद्या, व्याकरण, तत्वज्ञान, वास्तुशास्त्र इत्यादी प्रमुख विषय शिकवले जात. याशिवाय शल्यक्रिया, युद्धतंत्र, ज्योतिष, कृषिविज्ञान, फलज्योतिष, वाणिज्य, सांखिकी, विज्ञान, लेखाशास्त्र, संगीत, नृत्य, चित्रकला असे विषयही  शिकवले जात.

विद्यापीठात विद्यार्थ्यांना धर्मजातीनिरपेक्ष प्रवेश असे. हजार-बाराशे वर्षाच्या कालखंडात ज्या राजवटींनी तक्षशिला अधिराज्य केले. त्यांचा परिणाम तेथील अभ्यासक्रमावर व भाषेवरही कमी अधिक प्रमाणावर झाला. काही परकीय विषयांचे ज्ञानही या विद्यापीठात दिले जाई. इराणी व ग्रीक संस्कृतीचे अनेक इतर विषय व संकल्पना शिक्षणक्रमात समाविष्ट झाल्या. ब्राह्मी लिपी ऐवजी खरोष्टी लिपी चा वापर अधिक होऊ लागला. ग्रीक स्थापत्य कला व नानकशास्त्र यांचा समावेश अभ्यासवषयांत करण्यात आला. राजवटीत प्रामुख्याने ग्रीक, इराणी, मौर्य, इंंडो- बँक्ट्रियन, सिथियन, कुशान वगैरे अनेक राज्यकर्त्यांचा, राजकारणाचा, संस्कृतीचा आणि भाषांचा प्रभाव पडला. हजार बाराशे वर्ष अव्याहत शिक्षण कार्य करीत असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाची एकमेव प्राचीन विद्यापीठ होते. तथापि इसवीसन पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान याला येथे शैक्षणिक दृष्ट्या काहीच महत्त्वाचे दिसले नाही असे त्याच्या प्रवास वृत्तांत आवरून दिसते. कुशाणांच्या काळापर्यंत हे विद्यापीठ शिक्षणाचे केंद्र राहिले. नंतर गुणांनी सतत आक्रमणे सुरू झाली. या आक्रमणामुळे प्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठ नष्ट झाले.

३) वाराणसी (काशी) विद्यापिठ 

काशी ही नगरी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात प्रयाग पासून 128 किलोमीटर अंतरावर गंगेच्या उत्तर तीरावर वसलेली आहे. हीचे दुसरे नाव वाराणसी आहे. वरुणा व असी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेली नगरी म्हणून तिला हे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी गंगेने सुमारे सहा किलोमीटर दक्षिणोत्तर धनुष्याकृती वळण घेतले आहे त्या वळणात ही नगरी वसलेली आहे. प्राचीनता, पवित्रता व प्रशस्तता याबाबतीत काशीची बरोबरी कोणत्याही नगरीला करता येणार नाही. धर्मपीठ व विद्यापीठ असा काशीचा दुहेरी महिमा आहे. संस्कृतीचे, विद्येचे, व तत्वज्ञानाचे माहेरघर म्हणून या नगरीची पुरातन काळापासून प्रसिद्धी आहे. सध्याही ती कायम आहे. वैदिक व बौद्ध हे दोन्ही धर्म इथूनच सर्व भरतखंडात प्रसार पावले.

संपूर्णानंद वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी हे प्राच्यविद्याचे महापीठ असून विद्याकेंद्र म्हणून त्याची परंपरा शतकानुशतके अबाधित आहे. येथे गौतम बुद्ध, महावीर, कुमारिका भट्ट, शंकराचार्य इत्यादी अनेक विद्वानांनी अध्ययन, वाद-विवाद केले. बौद्ध साहित्यात येथील अनेक प्राचीन पाठशाळेचे उल्लेख आढळतात. परंतु काशी विद्यापीठास नालंदा व तक्षशिला विद्यापीठात प्रमाणे प्रतिष्ठा लाभली नाही. तरीसुद्धा दक्षिणेचे हे काही विद्यार्थी येथे विद्यार्जनार्थ येत असत.

ह्युएत्संगच्या मते येथील बौद्ध विहार, हिंदू मंदिरे व आश्रम यात श्रेष्ठ पंडित आणि ऋषीमुनी देशोदेशीच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असत. जातक कथा नुसार बुद्धाने येथे विभिन्न गायन शाखांचे अध्ययन केले होते. युआन त्वांग भारतात आला त्यावेळी (इसवीसन सातवे शतक) काशीत 30 बौद्ध विहार व 100 देवालये होती. पुढे जसजशी बौद्ध धर्माची अवनती होऊ लागली. त्या काळात काशीचे महत्व फार वाढले. वैदिक संस्कृती आणि संस्कृत भाषा यांचे ते पहिल्या प्रतीचे केंद्र ठरले. त्या काळात जी पुराणे लिहिली गेली त्यात काशीचा मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी काही काळ काशीत वास्तव्य करून काशीला विद्या व संस्कृती यांचे केंद्र बनविले. त्यांच्या अव्दैत तत्त्वज्ञानाची परंपरा त्यांच्या नंतरही काशी क्षेत्रात अखंडपणे चालू राहिली. वाराणसी ( काशी) विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठानंतरचे महत्वाचे विद्यापीठ होय. इसवी.सन सातव्या शतकात वाराणसी विद्यापीठाचा उदय झाला. हे विद्यापीठ प्राचीन काळातील असले तरी तक्षशिला विद्यापीठ याप्रमाणे प्रसिद्ध नव्हते. ते ब्राह्मणी विद्यापीठ असून या विद्यापीठात धार्मिक शिक्षणावर अधिक भर दिला जात होता. मध्ययुगीन काळापर्यंत अनेक लोक संस्कृत व वेदांचे अध्ययन करण्यासाठी काशीला येत असत. संत ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत व त्यानंतरही काशीला जाऊन ज्ञान प्राप्त करून आलेल्या ब्राह्मणांना विद्वान म्हणून मान दिला जात होता. येथील धार्मिक शिक्षणामुळे गौतम बुद्धाने काशी जवळील सारनाथ येथील मृगदाव नावाच्या वनात पहिले प्रवचन केले असावे. सम्राट अशोकाच्या काळात सारनाथ येथे हे प्रसिद्ध शिक्षण केंद्र होते.

४) विक्रमशिला विद्यापिठ

एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ (बिहार राज्य).

 तिबेटी परंपरेनुसार मगधाचा राजा धर्मपाल (कार 780-815)याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता. आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहाराला विक्रम नावाच्या यक्षाचे नाव देण्यात आले. यावेळी विहाराची पुढे प्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठ मध्ये परिनीती झाली. धर्मपाल याचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशिला ठेवण्यात आली आहे.

या विद्यापीठाच्या निश्चित स्थानाविषयी विद्वानांत मतभेद संभवतात. तथापि ते प्राचीन मगध देशात गंगेच्या काठी एका टेकडीवर प्रामुख्याने भागलपुर जवळ पाथरघाट टेकडीवर वसले होते. असे आता निश्चित झाले आहे. फणींद्रनाथ बोस यांच्या मते ते भागलपूर परगण्यात एका टेकडीवर असावे. नंदलाल डे आणि प्राच्यविद्यापंडित अ.स. अळतेकर, अंग राज्याची राजधानी असलेल्या चंपा नगरच्या पूर्वेला 38 किमी दूर असलेले पाथरघाट नामक स्थान म्हणजेच विक्रमशिला असावे या मताचे आहेत. या ठिकाणाला 1811 साली बुचानन याने प्रथम भेट दिली. सतीशचंद्र विद्याभूषण यांनी मात्र सुलतानगंज (भागलपूर जिल्हा) हे स्थान म्हणजेच विक्रमशिला हे निश्चित केले आहे.

पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने 1960 ते 69 मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अॅटिचक येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यानेही 1972 -73 पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशिला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. तेथील भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात.

लामा तरा नात या सोळाव्या शतकातील तिबेटी भिकुचा बौद्ध धर्माच्या इतिहासात विक्रमशिला विद्यापीठाची माहिती मिळते धर्मपाल राजाने महाविहार बांधून बौद्ध धर्माच्या चार प्रमुख पंथांचे प्रत्येकी 27 असे 108 अध्यापक चार विभागात नेमले आणि महावीर आस महाविहार आस देणग्या दिल्या नंतरच्या पाल राज्यांनीही या विद्यापीठास तसेच नालंदा व सोंपुरी सारख्या अनेक शिक्षण संस्थान केंद्रांना आर्थिक सहकार्य केले होते इतर धनिकांनी ही त्याच देणग्या दिल्या महाविहरा भोवती तटबंदी असून चार दिशांना महाद्वारे होती प्रत्येक प्रवेशद्वारावर एक प्रवेश परीक्षा ग्रह होते राजा देव पाल्याने कार 815 855 आणखी दोन पर प्रवेश परीक्षा ग्रह बांधली या

Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी