Skip to main content

पितळखोरे लेणी


विकिपीडिया

पितळखोरे लेणी

महाराष्ट्रातील प्राचीन लेणी

पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यातकन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.

पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या कलावैभवाचा सविस्तर अभ्यास डॉ. म.न. देशपांडे यांनी केला आहे.

रचनासंपादन करा

या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकलाक्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे.[१]

गावसंपादन करा

पितळखोरे गाव चाळीसगाव व कन्नड तालुक्यांच्या मधील औट्रम घाटातील ही एक लेणी आहे.

चित्रदालनसंपादन करा

निर्माणसंपादन करा

Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी