कोकण विभाग
सुस्वागत कोकण विभाग
अशोक (इ.स. पूर्व २७३ ते २३२) हा भारतीय इतिहासातील एक सुप्रसिद्ध राजा होता. इसवी सन पूर्व २५४ च्या सुरुवातीला अशोकाने त्याच्या साम्राज्यात बौद्ध धर्मासंबंधी काही शिलालेख कोरले. त्यापैकी एका शिलालेखावर त्याने सिरिया, इजिप्त , मॅसेडोनिया, सायरेन आणि इपिरस येथील ग्रीक राजांकडे धर्मप्रसारक पाठविल्याचा उल्लेख आहे.
त्या्ने महत्वाच्या ठिकाणी सात दगडी खांबांवरही शिलालेख कोरले. तसेच बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्धांच्या अवशेषांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या स्मृती जतन करण्यासाठी अशोकाने ८४ हजार स्तुप बांधले.
सोपारा स्तुप, बौद्ध पुरातत्वीय ठिकाणसोपारा हे प्राचीन प्रसिद्ध बंदर उत्तर कोकणात आहे. सोपारा आणि चौल (चंपावती) ही भरभराटीला आलेली व्यांपारी केंद्र आणि बौद्ध धर्माची अभ्यासपीठे होती. या ठिकाणांना इसवी सन पूर्व २५०० पासूनचा इतिहास आहे. सोपाऱ्याचे इजिप्त, बाबिलोनिया आदी देशांशी व्याापारी संबंध होते.
इ.स. पूर्व ३ मध्ये येथे बौद्ध धर्मियांचा तळ होता, असे सांगितले जाते. १८८२ मध्ये सोपाऱ्यामध्ये अशोक कालीन स्तुप सापडला. तो १४ पैकी आठवा स्तुप होता. १९५६ मध्ये ९ वा स्तुप भुईगाव नावाच्या गावात सापडला. त्यामुळे या भागात बौद्धधर्माचा प्रसार झाला होता, असा निष्कर्ष काढण्यात आला. या स्तुपांचे अवशेष मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रावर मौर्यांचे आक्रमण इ.स. पूर्व ३२१ ते १८१ या काळात झाले इसवी सन पूर्व ३१५ मध्ये मौर्य गुजरातकडून सोपाऱ्यात शिरले. त्या नंतर इ.स. पूर्व १९२ ते १०० या काळात उत्तर कोकणावर सातवानाचे राज्य प्रस्थापित झाले होते.
Comments
Post a Comment