Skip to main content

खरोसा लेणी


खरोसा लेणी

महाराष्ट्रातील प्राचीन लेणी

खरोसा हे लातूर जिल्यातील निलंगा तालुक्यातले गाव आहे. हे गाव लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे.

प्राचीन लेणीसंपादन करा

येथे इ.स. सहाव्या शतकातील कोरीव लेणी व शैलगृहेआहेत. लातूर-बिदर रस्त्यापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर ही लेणी कोरलेली आहेत. येथे एकूण १२ गुंफा असून ही जांभ्या दगडांमध्ये कोरलेली आहेत. या दगडाच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नैसर्गिक झिजेने आणि लेण्यांबद्दल असलेल्या अनास्थेमुळे ही लेणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लेणी अपूर्ण आहेत. सुरुवातीस बौद्ध लेणी आहेत. त्यांचे प्रवेशद्वार लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केलेले असल्यामुळे आत जाता येत नाही. बुद्धमूर्तीच्या खाली चौथरा बांधलेला व नित्य पूजाअर्चा चालू असलेली दिसते.[१]

स्वरूपसंपादन करा

पहिले लेणे बौद्ध लेणे असून लेण्याच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुद्ध मूर्ती आहे. येथे शिवलिंग आहे, त्याची स्थापना नंतर केलेली आहे.[१]

कलात्मक अविष्कारसंपादन करा

खरोसा लेणी शिल्प


हेही पहासंपादन करा


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, डॅा. सुनिल पुरी

Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी