तुळजा लेणी महाराष्ट्रातील लेणी तुळजा लेणी हा महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातील एक लेणी समूह आहे. शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजूला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ साधारण ३ किलोमीटर लांबीवर एक टेकडी लागते... त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी आहेत. भारतातील एकूण लेण्यांपैंकी सर्वांत जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्यापैंकीच तुळजा लेणी... तुळजा लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी... ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. या लेण्यांमध्ये असलेला स्तूप हा अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्तूपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट... बाजूलाच बौद्ध भिक्षूंसाठी दगदांतून कोरलेले विहार, भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तूपाची पूजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेण्यामध्ये कोरलेले दिसते. डोंगरावरुरू कोसळणारे धबधब्याचे पाणी थ...
Comments
Post a Comment