Skip to main content

औरंगाबाद लेणी


औरंगाबाद लेणी

महाराष्ट्रातील बौद्ध लेणी


औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे शतकयादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली आहे. यात लेण्यांची संख्या १२ इतकी आहे.

औरंगाबाद लेणी
Aurangabad Caves, another view.JPG
औरंगाबाद लेणी
नावऔरंगाबाद लेणी
उंची
प्रकारलेणी
चढाईची श्रेणी
ठिकाणऔरंगाबादमहाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना{{{स्थापना}}}

तुलनेने मृदू अशा बेसॉल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहे आणि त्याच्या स्थानावरून ही सर्व १२ लेणी मुख्यत्वे तीन गटांत विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेणींचा संबंध लावला जातो. अजिंठ्याची लेणी आणि वेरूळची लेणी ही युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थाने म्हणून घोषित झाली आहेत.

यातील लेणे क्रमांक ३ हे अजिंठ्याच्या महायान लेण्यांच्या शैलीतील आहे. लेणे क्रमांक ७ हे मात्र वेरूळच्या रामेश्वर लेण्याशी (लेणे क्रमांक २४) मिळतेजुळते आहे. त्यात पुढे व्हरांडा असून मागील भिंतीत गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत भिक्खूंच्याखोल्या आहेत. ही बुद्ध लेणी भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना दर्शवितात.

प्राथमिक माहितीसंपादन करा

सहाव्या आणि आठव्या शतकाचा विचार करता औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहराच्या मध्यभागापासून नऊ किमी तर सध्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठआणि बीबी का मकबरा परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. त्यांतील शिल्पे अजिंठा आणि वेरूळ लेणीयांच्याया तुलनेत खूपच लहान, अधिक जीर्ण आणि कमी भेट दिली गेलेली आहेत. ही लेणी बघायला सुरुवात केली असता असे लक्षात येते की, "वेळ आणि स्थळ आणि काळ यात वसलेले हे संवेदनशील जीवन होय”. ही लेणी ही हे भारतीय पुरातत्त्व खात्याने मान्ता दिलेले संरक्षित स्मारक आहे.संदर्भ हवा ]

लेणे क्रमांक १ आणि ३संपादन करा

औरंगाबाद लेणीतील लेणे क्र.१ आणि क्र. ३ आणि अजिंठ्याची शेवटचे लेणे यात साम्य आहे. म्हणूनच यांना २०व्या शतकातील काही विद्वान अजिंठा-वेरूळ लेणींचा दुवा म्हणतात. इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते तिसरी लेणी ही पहिल्या लेणीच्या आधीची असावी. कारण तिसऱ्या लेणीतील जाळीचे नक्षीचे काम व्यवस्थित आणि संघटित आणि सुशोभित दिसते केले आहे. यातील भौमितिक रचना बिनचूकपणा सर्वोच्च आहे.

छायाचित्रेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा


Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी