कान्हेरी लेणी


प्राचीन लेणी

कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळसाष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहेत. ही लेणी इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. १ ले शतक यादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहेत.[१] 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या संस्कृत नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ६ कि. मी. व बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि. मी. अंतरावर आहेत.[२]पर्यटकांसाठी ह्या लेणी (गुंफा) सकाळी ९ पासून उघड्या असतात. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते.

कान्हेरी लेणी
Kanheri Caves prayer hall.JPG
कान्हेरी लेणी, महाराष्ट्र
Map showing the location of कान्हेरी लेणी
Map showing the location of कान्हेरी लेणी
स्थानमुंबई, महाराष्ट्र
भूविज्ञानबसाल्ट खडक

कृष्णगिरी या शब्दाचा कान्हेरी असा अपभ्रंश असावा असे मानले जाते. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णीराजाच्या काळात (इ. स. १७३ - इ. स. २११) कोरली गेली असावी असा अंदाज आहे.[३]

बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत. डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी खोदलेली आहेत. [४]

इतिहाससंपादन करा

कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण १०९ लेणी (गुंफा) आहेत.[५]जवळची एलेफंटा गुंफा शोभिवंत, लकाकीयुक्त व सुंदर पैलू पाडून बनविलेली आहे. प्रत्येक गुंफेतील जमीन म्हणजे गुहेचा दगडी पाया आहे. त्यात मोठाल्या खांबांनी युक्त असे भव्य सभागृह आहे. त्यात बुद्ध धर्मीयांचे पवित्र स्तूपही आहे. वरील बाजूस पाण्याचा पाट आणि हौद आहे. पुरातन काळात पावसाचे पाणी विशेष प्रकारे वळवून पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात असत.

गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होई आणि तेथे बौद्ध धर्मीयांचे पुढील कार्यक्रम चालू होत. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील बौद्ध धर्मीयांच्या कोकण कोस्ट सामोपचाराच्या दृष्टीने कान्हेरी गुंफांना फार महत्त्व आहे. बौद्ध प्रभाव घेऊन आलेली ही लेणी कृष्णगिरी उपवनातील भव्य खडकाळ पृष्ठभागावर बरीच दुरून दृश्यमान होणारी एक वस्तू आहे.

बहुतेच गुंफांचा वापर बौद्धधर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. मोठ्या गुंफामधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाई. अवलोकितेश्वराची मूर्ती ही एक वेगळेच विशेष दर्शन देते. बौद्ध संघातील जीवनात काय हवे आहे, याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेच विहारातील मठाधीश देत असतात. येथील संघ बऱ्याच व्यावसायिक केंद्राशी जोडलेले आहेत. त्यात सोपारा बंदर, कल्याण, नाशिक, पैठण आणि उज्जैन समाविष्ट आहेत. मौर्य आणि कुषाण हे सत्ताधारी होते तेव्हा कान्हेरी हे विद्यापीठ होते. १० व्या शतकाच्या शेवटी शेवटी (९८० - १०५४) अतिशा ही बौद्ध शिक्षिका कृष्णगिरी विहारात राहुल गुप्ता यांचेकडून बौद्ध ध्यानसाधना शिकण्यासाठी आली होती.

शिलालेखसंपादन करा

सुवाच्य अक्षरातील ५१ शिलालेख आणि २६ वचननामे (एपिग्राफ्स) येथील संशोधनात सापडली आहेत. ही ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांत आहेत. ९० क्रमांकाच्या गुंफामध्येही वचननामे (एपिग्राफ्स) सापडली. त्यांत एक अतिशय महत्त्वाचा शिलालेख आहे, त्यात सातवाहन राजा वाशिष्टिपुत्र याचा रुद्रदवर्णची कन्या सतकरणी हिच्याशी विवाह झाल्याचा संदर्भ आहे.[६]

रंगकामसंपादन करा

२७ क्रमांकाच्या गुंफेमध्ये छताला असलेले बुद्धाचे चित्र अपुरे रंगविलेले आहे.

ठिकाणसंपादन करा

कान्हेरी लेणी (गुंफा) या संजय गांधी राष्ट्रीय पार्कच्या (बोरीवली नॅशनल पार्कच्या) अगदी आतील बाजूस आहेत. पण तेथे जाण्यासाठी (?)प्रत्येक तासाला वाहन व्यवस्था आहे (कुठून?). पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय पार्काच्या मुख्य गेटावर आणि गुंफाच्या प्रवेश द्वारावर प्रवेश शुल्क भरावे लागते.

संशोधनसंपादन करा

फेब्रुवारी २०१५ मध्ये संशोधक सूरज पंडित व त्यांच्या गटाने सात नव्या गुहांचा शोध लावला आहे.[७]

परिसरसंपादन करा

सहली काढणाऱ्याला ही जागा पावसाळ्यात अतिशय आनंद देते. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत. वाहणारे झरे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. येथे सप्ताहान्ताचे सुटीचे दिवस सुखात आणि आरामात घालवता येतात.[८]

चित्रदालनसंपादन करा

संदर्भसंपादन करा






Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी