Skip to main content

गांधारपाले लेणी


महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध लेणी

गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील गोवा महामार्गावर आहे. ह्या गुहा एनएच -17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत.

ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. ही लेणी मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या उत्तरेस ३ किमी अंतररावर असलेल्या डोंगरात कोरलेली आहेत.

रचनासंपादन करा

ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहे. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत. पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी सुमारे २०-२५ मिनीटे लागतात.

लेणी क्रमांक १संपादन करा

हे एक चैत्यगृह असून याला सात कमानी आहेत. लेण्याला सहा खांबी ओसरी असून ओसरीच्या मागे भव्य दालन आहे. सहा खांबांपैकी फक्त एकच खांब पूर्णपणे कोरलेला आहे, बाकीचे पाच अर्धवट आहेत. दालनात जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. दालनात उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केलेली आहे. दालनात प्रवेश केल्या नंतर आपल्याला डावीकडच्या भिंतीत चार, तसेच समोरच्या भिंतीत मध्यभागी गर्भगृह आणि गर्भगृहाच्या शेजारी दोन्ही बाजूना दोन दोन खोल्या आहेत. या भव्य दालनाला सर्व बाजूनी ओटा खोदलेला आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी बुद्धमूर्ती तोरणात बसवली आहे. मूर्तीची बरीच नासधूस झालेली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धम्मचक्र, हरणे, चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. ही मूर्ती ज्या प्रस्तरात कोरली आहे त्याच्या मागील भागात आसनस्थ बुध्दमूर्तीचा आराखडा दिसतो. मूर्ती खोदण्यापूर्वी तिचे रेखाचित्रे कोरण्याची पद्धत महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघावयास मिळत नाही. [१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


Comments

Popular posts from this blog

वीर_मराठा_योद्धा_महादजी_शिंदे

त्रिरश्मी लेणी

तुळजा लेणी